SBPPS Color Strip
PIMPRI CHINCHWAD EDUCATION TRUST'S
S.B. PATIL PUBLIC SCHOOL
CBSE Affiliated | NABET Accredited | British Council IDS Certified
A journey towards excellence.
Highlights

Sports and Fitness 2022 - 23

हर्षिता काकडे या एस.बी. पाटील पब्लिक स्कूल मधील ईयत्ता
10 वी मधील विद्यार्थिनींची खेलो इंडिया २०२२ स्पर्धेसाठी निवड

10 वी मधील विद्यार्थिनींची खेलो इंडिया २०२२ स्पर्धेसाठी निवड

पिंपरी चिंचवड एडुकेशन ट्रस्ट च्या एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील हर्षिता काकडे मागील ५ वर्षांपासून जिम्नॅस्टिक्स चे प्रशिक्षण घेत आहे. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी डोंबिवली येथे राज्यस्तरीय स्पर्धेतून जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी तिची निवड झाली. २२ ते २६ नोव्हेंबर २०२१ जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाला उपविजेते पद मिळाले व खेलो इंडिया स्पर्धेसाठी संघाची निवड झाली.या मुळे पिंपरी चिंचवड मधून आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स साठी निवड झालेली हर्षिता पहिली महिला खेळाडू आहे. या सर्व निवड झालेल्या संघाचा सराव कॅम्प दिनांक २१ मे ते २ जून बालेवाडी क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. २ जून रोजी संघ हरियाणा अंबाला येथे दिनांक ५,६,७,जून रोजी होणाऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्स साठी रवाना झाला.

खेळा खेळाबरोबरच शालेय अभ्यासात देखील हर्षिता योग्य ताळमेळ साधते. यासाठी हर्षिता चे आई, वडील आणि शाळेतील क्रीडा शिक्षक धनाजी पाटील आणि सुनीता वासुदेव या सर्वांचे सहकार्य तिला लाभले. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्वस्थ राहण्यासाठी योगासने, जिम्नॅस्टिक्सचा नियमित सराव महत्वाचा आहे असे हर्षिताने आपल्या यशाचे गुपित सांगितले.

पिंपरी चिंचवड एडुकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, विश्वस्थ हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, उपमुख्याध्यापिका पद्मावती बंडा आणि सर्व शिक्षकांनी हर्षिताला पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा दिल्या.